Best Information about Mahila Bachat Gat
बचतगटांची सुरवात . बचतगटाची संकल्पना महिलांसाठी एक संजीवनी ठरली आले, चूल आणी मुलं यात अडकलेली स्त्री यामुळे बाहेर पडली , महिला सक्षमीकरण आणी सबली कारणाच्या दृष्टीने ही क्रांतिकारक चळवळ ठरली 1992 साली राष्ट्रीय कृषी आणी ग्रामिण बँक (नाबार्ड ) यांनी स्वयंसहायता गट जोडणी कार्यक्रम हाती घेतला आणी ग्रामिण भागात बचत गटांना एक वेगळेच महत्व प्राप्त झाले.. अडचणीच्या काळात सुलभ कर्ज उपलब्ध व्हावे ,सावकारी पद्धतीला आळा बसावा या उद्धेशाने बचतगट स्थापन झाले त्याचे स्वरूप आता खूपच बदलले आहॆ. बचतगटामुळे बचतीच्या सवयींबरोबरच स्वयंरोजगाराची प्रेरणा मिळाली .ग्रामिण भागात बचतगटांच्या माध्यमातून बऱ्याच स्रिया पुढे आल्या कुकूट पालन , कुटीर उद्योग ,गृहउद्योग यामध्ये पुढे आल्या आणी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आज कित्येक स्रिया बचतगटाच्या मार्फत उद्योग क्षेत्रात यश मिळवत आहेत , स्रियांमधे वेळेचे नियोजन ,आर्थिक नियोजन, जबाबदारीची जाणीव ,कष्ट करण्याची तयारी ,नेतृत्व गुण ,संभाषण कौशल्य हे गुण उपजतच असतात याची जाणीव झाली यामुळे उद्योग क्षेत्रात स्रिया वेगळीच उंची गाठु शकतात हे सिद्ध झाले. बचतगटाची व्याप्ती वाढत आहॆ शहरी भागात ही बचतगट संकल्पनेतुन बऱ्याच महिला पुढे आल्या आहेत. बचत गटांकडे आता एका नव्या व्यावसायिक दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहॆ.यातुन आर्थिक ,सामाजिक ,सांस्कृतिक जबाबदारीची जाणीव वाढीस लागत आहॆ .तरीही शहरी भागामध्ये बऱ्याच जणांना बचतगट म्हणजे काय हेच माहिती नाही त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत ,अपुरी माहिती आणी गैरसमज मुळे बचतगट चालवणे आणी टिकवणे महिलांना अवघड जाते.. त्यामुळे बचतगट सुरु करत असताना बचतगटाचे नियम आणी पद्धत माहिती असणे गरजेचे आहॆ . बचतगट कसा स्थापन करावा . बचतगट महिलांचा किंवा पुरुषांचा ही असु शकतो. एका विचाराचे काही लोक एकत्र येऊन हा गट तयार करतात . 1) यासाठी इच्छुक लोकांची पहिली सभा घेतली जाते यात कमीत कमी 10 आणी जास्तीत जास्त 20 महिला किंवा पुरुष सभासद म्हणुन एकत्र येऊन एक ठराविक बचतीची रक्कम ठरविली जाते . 2) गटाला एक नाव सर्वांच्या संमतीने दिले जाते .आणी प्रतिनिधी म्हणुन 3 व्यक्तीची निवड केली जाते अध्यक्ष , उपाध्यक्ष आणी खजिनदार . 3) बचतगटाच्या नावाचा गोल शिक्का आणी अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,खजिनदार नावाचा आडवा शिका बनविल्या शिवाय खाते उघडता येत नाही . 4) जवळच्या बँकेत फॉर्म भरून कागद पात्राची(प्रतिधींचे आधारकार्ड ,फोटो ,लाईटबील इ ..) पूर्तता करुन खाते उघडले जाते ( बँक नॅशनलाईज असावी किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत चांगली ) 5) नगरपालिका ,ग्रामपंचायत ,पंचायत समिती आपल्या भागात जे असेल तिथे गटाची नोंद करावी आणी नोंदणी नंबर घ्यावा त्याशिवाय शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही . 6) प्रत्येक महिन्याच्या ठरावीत तारखेत पैसे बँकेत भरावेत . सुरवातीचे 6 महिने तरी बाकी व्यवहार करु नये . 7) पुरेशी रक्कम जमा झाल्यानंतर 6 महिन्यानंतर अंतर्गत कर्ज देण्यास सुरवात करावी त्याला ठराविक व्याज आकारावे (2%) बचतगटाचे नियम . 1) एका गटात कमीत कमी 10 आणी जास्तीत जास्त 20 सभासद असतात . 2) बचत गटातील सभासद महिला ही गावाबाहेरील नसावी. 3) बचतगटात सर्वांनी समान बचत असावी, सर्व सभासदांनी गटाच्या बैठकीला नियमित हजर रहावे. 4) नियमित रक्कम जमा केली नाही तर त्यास दंड ठेवावा. 5) सभासदांना एक ठराविक रक्कमच कर्ज स्वरूपात दयावी कर्जफेडीसाठी ठराविक कालावधी आणी योग्य ते हप्ते ठरवावे (हा व्याजदर दरमहा ३% पेक्षा जास्त नसावा.) 6).गटाच्या बाहेरील व्यक्तीस कर्ज देऊ नये. पण दुसऱ्या बचत गटास कर्ज देण्यास हरकत नाही. 7).जर ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे कर्ज हवे असेल तर बचत गटातील दोन सभासदांना त्यासठी जामीन रहावे लागेल. 8).प्रथम घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय दुसरे कर्ज देऊ नये. अटी आणी मार्दर्शक तत्वे . 1).सभासदाचे वय १८ पेक्षा जास्त असावे किंवा ती विवाहित असावी. 2).गट सुरु झाल्यानंतर काही महिन्यांनी एखादी महिला गटात येण्यास तयार असेल तर तिला गटातील सर्व सभासदांच्या संमतीने, गटातील सदस्यसंख्या पाहून, गटात सामिल करून घ्यावे. या नवीन सभासदाने पूर्वीचे इतर सभासदांइतके पैसे भरावे. 3).एक महिला एका वेळी एकाच गटात सभासद होऊ शकते अन्यथा सभासदत्व रद्द होऊ शकते . 4).मासिक बैठकीची तारीख, वेळ व जागा निश्चित करावी. 5).गटाचे अध्यक्ष तसेच इतर सभासदांची हिशोबाचे कामकाज शिकून घ्यावे. 6).बचत गटाच्या सर्व नोंदी – लेजर, पासबुक व मिटींग नोंदवही – सभा संपल्यानंतर लगेच लिहाव्या 7).बचत गटात जमलेल्या रकमेतून गृहउद्योग, कुटीर उदयोग किंवा आपल्या भागात चालत असलेला उदयोग करावा. ही सर्व कार्ये गटातर्फेच व्हायला पाहिजेत असे नव्हे तर सभासदांना वैयक्तिक रित्या फायदा घेऊ शकते . 8).बचत गटांनी वर्षातून किमान एकवेळा आपल्या वह्या स्थानिक जाणकाराकडून तपासून घ्याव्यात. बचतगट म्हणजे काय आणी बचतगट तयार करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची माहिती मि या ब्लॉग मधे देण्याचा प्रयत्न केला आहॆ . दुसऱ्या ब्लॉग मधे बचतगटाचे फायदे शासकीय योजना यांची माहिती देण्याचा प्रयत्न करेन 🙏 सौ .मेघा पवार . मोशी, पुणे 💐

Best Information about Mahila Bachat Gat

https://myblogarworld.blogspot.com/2020/01/blog-post.html?m=1

Shop By Department